Thursday, November 13, 2008

कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज गोदावरीची महाआरती !

आपल्या कुटूंबातील सदस्याच्या दीर्घायुष्यासाठी शेकडो महिला प्रत्येकी ११ दीवे गोदावरीच्या पात्रात सोडून गोदावरीची आरती करणार असून दिव्यांची व द्रोणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

सायंकाळी ६ वाजता नगीना घाट येथील नव्याने बांधलेल्या घाटावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांसाठी अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट आरतीची थाळी सजविलेल्या आणि आकर्षक वेशभुषा केलेल्या २१ महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

हरिद्वार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला लाखो महिला अशा प्रकारे गंगेची आरती करतात.
त्याच धर्तीवर नांदेड येथे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सोहळ्याची सुरुवात होत असल्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थीत राहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.








Monday, November 3, 2008

राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील आज नांदेड दौऱ्यावर !


गुरू-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त सोनिया गांधी, पंतप्रधान श्री. मनमोहन सिंघ यांच्यासह इतरही बऱ्याच मान्यवरांनी यापुर्विच नांदेडमध्ये उपस्थिती लावली आहे.
याच सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आज राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत.

यशवंत कॉलेजच्या मैदानावर नांदेड वाघाळा महानगर पालिकेतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाने असेल :-

१) सकाळी १०.१५ ला नांदेड विमानतळावर आगमन.
२) त्यानंतर त्या सचखंड गुरुद्वाऱ्याकडे रवाना होतील.
३) दर्शन घेतल्यानंतर ११.४० वाजता त्यांचे समागम मंडपात आगमन होईल.
४) तेथून त्या १२.१५ वाजता सत्कार सोहळ्याकरीता यशवंत कॉलेजकडे प्रयाण करतील.
५) हा सोहळा १.३० वाजता संपेल.
६) त्यानंतर पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आयोजिलेल्या भोजन समारंभास त्या उपस्थित राहतील.
७) तेथून २.३० वाजता त्या विमानतळाकडे रवाना होतील आणि ३.०५ वाजता त्यांचे दिल्लीकडे प्रयाण होईल.

अश्या प्रकारे त्यांचा तब्बल पाच तासाचा नांदेड दौरा असेल.


सत्कार समारंभ स्थळाची काही छायाचित्रे :-



Saturday, November 1, 2008

श्री.गुरु गोविंदसिंघ स्पोर्ट्स फेस्टीवल

नांदेड येथील श्री.गुरु गोविंदसिंघजी मैदानावर पार पडलेल्या श्री.गुरु गोविंदसिंघ स्पोर्ट्स फेस्टीवलमधील काही रोमहर्षक क्षण.